ठाणे : शिवजयंतीचं औचित्य साधून तेजस आणि सौजस या दोन भावांनी साकारलेल्या ‘आमचं शिवाजी राजं’ शिवगीताचं अनावरण ठाणे महापौर नरेश म्हस्के व दैनिक जनादेशचे संपादक  कैलाश म्हापदी यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर दालनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजेश मोरे, गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते. ‘आमचं शिवाजी राजं’ गायक सौजस मोरे, गायक विलास अटक यांनी बहारदारपणे सादर केलं आहे. ते अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या नसानसात भिनेल, असा शुभाशिर्वाद महापौर म्हस्के यांनी दिला तर कैलाश म्हापदींनी मोरे भावांच्या या गीताला डिजीटल माध्यमांवर भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *