मुंबई : तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता  पुष्पा सिनेमातील गाण्याची आणि डॉयलॉगची क्रेझ आता भारतातच नव्हे तर परदेशातही दिसू लागलीय. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यांवर (Srivalli Song) लोक जोरदार रील्स बनवत आहेत. श्रीवल्ली गाण्यानं सेलिब्रेटींपासून ते कॉमन मॅन सर्वांनाच वेड लावल असून खूपच लाेकप्रिय झालय.

‘पुष्पा: द राइज’ (Pushpa) या चित्रपटाला जगभरातून खूप प्रेम मिळत आहे. आंध्रप्रदेशमधल्या घनदाट शेषाचलमच्या जंगलातल्या लाल चंदनाच्या तस्करांची ही कहाणी आहे. या जंगलाचा राजा बनलाय ‘पुष्पा.. पुष्पराज’. पुष्पाची भूमिका अल्लू अर्जुनने उत्कृष्टपणे साकारलीय. चित्रपटात डायलॉग आणि खास डान्स स्टेप्स ही अल्लू अर्जुनची खासियत ठरलीय.  या सुपरहिट चित्रपटाने फक्त तेलगूच नाही तर इतर भाषांमध्येही दमदार व्यवसाय केला आहे. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर ने या सिनेमातील सुपरहिट डायलॉगवर लिपसिंक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनाही डेविडचा हा व्हिडिओ प्रचंड आवडला. ‘पुष्पा’ हा सिनेमा या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १८८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जननेही चांगली कामगिरी केली असून वर्षातील सुपरहिट सिनेमांमध्ये स्थान मिळवलं आहे.

श्रीवल्ली गाण्याचं मराठी रिमेक …


अल्लू अर्जुन  (allu arjun) आणि रश्मीका मंदना यांचा पुष्पा द राईज या चित्रपटातील गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलय. सामी, हे बिड्डा ये मेरा अड्डा .., श्रीवल्ली या गाण्यावर प्रत्येकजण रील बनवत आहे. आता या गाण्याचा मराठी रिमेक आला आहे. या मराठी रिमेकला लाखो लोकांनी पसंती दिलीय. अमरावती येथील विजय खंडारे याने गाण्याचा मराठी रिमेक केला आहे. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या गाण्यात विजय खंदारेसोबत  (vijay khandare) तृप्ती खंडारे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तिनं या गाण्यात श्रीवल्ली साकारली आहे.या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे त्याने हे गाणं मोबाईवर चित्रीत केले आहे. 

कोण आहे विजय खंडारे ….

विजय खंडारे हा मुळचा अमरावती जिल्हयातील तिवसा या गावातील आहे. तो आणि त्याची पत्नी तृप्ती खंडारे हे दोघेही युटूब वर व्हराडी भाषेतच कॉमेडी व्हिडीओ बनवतात. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याच्या मराठी व्हर्जनने तो रातोरात प्रकाश झोतात आला आहे.
विजय अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून पुढं आलाय. लहानपणापासून भाजी विक्रीपासून ते हमालीपर्यंतचे काम त्याने केले आहेत. त्याचे वडील हात गाडीवर एक छोटासा व्यवसाय करतात. त्याची आई एक गृहिणी आहे. कर्जबाजारीपणामुळे मुळ घर विकण्याची वेळ त्याच्यावर आली. भूईमुगाच्या शेंगा विकण्याचा किरकोळ व्यवसाय त्याने केला. मात्र लॉकडाऊनमुळे हमाली करीत घरची परिस्थिती सांभाळली. मात्र वेळ मिळेल तेव्हा व्हिडीओ बनविण्याची जिद्द कायमच होती. घरातील परिस्थिीमुळे त्याला बीएस.सी. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आता युटूबच्या माध्यमातून करिअर घडवतोय. श्री वल्ली या गाण्याचा मराठी व्हर्जन त्याने बनवला आहे. या त्याच्या मराठी गाण्याला सोशल मीडियावर अनेकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्याने स्वत: हे मराठी गांण लिहून स्वतः या गाण्याला आवाज दिला आहे. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांनी मिळून हा नवीन मराठी व्हर्जन तयार केला आहे. विशेष म्हणजे हे गाणे मोबाईल वर चित्रित करण्यात आले आहे. गायक आणि गीतकार असे दोन्ही भूमिका बजावीत रातोरात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलाय.

श्रेयसच्या आवाजाची जादू …..


‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदीमध्ये या चित्रपटाला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिलाय. त्यामुळे श्रेयसचे खूपच कौतुक होत आहे. श्रेयसचा २७ जानेवारी रोजी  वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘आपडी थापडी’ असे असून यामध्ये तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!