डोंबिवली : शहरातील सर्वात जुना पत्रकार संघ म्हणून ओळख असलेला डोंबिवली पत्रकार संघाची २०२२ – २३ ची नवीन कार्यकारिणी जाहिर झाली. यावेळी महावीर बडाला (अध्यक्ष), शंकर जाधव (उपाध्यक्ष), प्रशांत जोशी (सचिव), सोनल सावंत- पवार (कोषाध्यक्ष) या पदावर नियुक्ती करण्यात आली. हॉटेल मॉर्डन प्राईड येथे पत्रकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीत मावळते अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव श्रीराम कांदू यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत कार्यभार सोपविला.