डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांच्या मातोश्री द्रौपदीबाई सखाराम म्हात्रे यांचे आज सकाळी डोंबिवली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. मृत्युसमयी त्या 104 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, मुकुंद म्हात्रे, गुरूंनाथ म्हात्रे ही 4 मुले ,2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या सासूबाई होत्या. पश्चिमेतील देवीचापाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकिय आणि सामाजिक शैक्षणिक, व्यावसायिक सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!