मुंबई : लाचखोरी, गैरव्यवहार, बेजबाबदारपणा असा ठपका ठेवीत निलंबित करण्यात आलेल्या तब्बल ११७ कर्मचा-यांना मुंबई महापालिकेने पून्हा सेवेत घेतलं आहे आधी कामावरून कमी करायचं आणि कर्मचारी नाहीत म्हणून पून्हा सेवेत घ्यायाचे असा पालिकेचा प्रताप समोर आल्याने टीका होत आहे.
कोविड संकटावेळी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने आरोग्य विभागाशी संबंधित निलंबित अधिकाऱ्यांना परत घेण्याकरता आयुक्तांनी आदेश दिले होते. मात्र आरोग्य विभागासोबतच इतर सर्व विभागातील निलंबीत कर्चाऱ्यांचंही निलंबन रद्द करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आरटीआयअंतर्गत् ही माहिती उजेडात आलीय. यात आरोग्य विभागातून 17 तर तीन वेगवेगळ्या रुग्णालयातील 6 जणांना परत कामावर घेतलं गेलं आहे. घनकचरा विभागातून 53, मुख्य अभियंता विभागातून 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशामक विभागातून प्रत्येकी 6 निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत रुजु करुन घेण्यात आलंय .