मुंबई : मुंबई महानगरातील कोविड-१९ विषाणू संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आणून केलेल्या असाधारण कामगिरीबद्दल आणि ‘मुंबई मॉडेल’ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनामध्ये आदर्श उदाहरण निर्माण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘क्विम्प्रो २०२१’ हा पुरस्कार व पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.

आरोग्य व शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी कार्यरत क्विम्प्रो फाऊंडेशनद्वारे हा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तिपत्र चहल यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. दुसऱया महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपान देशाला सावरण्यासाठी गुणवत्ता सुधारणा आणि गुणवत्ता व्यवस्थापन याअनुषंगाने मार्गदर्शन करणारे आणि ‘क्वालिटी गुरु’ म्हणून जगभरात नावाजलेले डॉ. जे. एम. जुरान यांनी भारतातही गुणवत्तेवर भर देणारी राष्ट्रीय संस्कृती निर्माण व्हावी म्हणून क्विम्प्रो फाऊंडेशनच्या स्थापनेला बळ दिले. तसेच आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, या क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱया मान्यवरांना गौरविण्यासाठी क्विम्प्रो पुरस्कार सुरु करण्याची संकल्पनाही त्यांनी दिली. त्यानुसार या फाऊंडेशनच्या वतीने सन १९८९ पासून आतापर्यंत फक्त चार वेळा पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासाठी अत्यंत असाधारण कामगिरी हा निकष प्रामुख्याने लक्षात घेतला जातो.

मुंबई महानगरामध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग परिस्थिती रोखण्यासाठी वॉर्ड वॉर रुम अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांची अनोखी संकल्पना राबवून केलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन, वैद्यकीय उपचारांसाठी अल्पावधीमध्ये उभारलेली निरनिराळी जम्बो कोविड सेंटर्स, टेस्टींग-ट्रेसिंग-ट्रॅकींग-ट्रिटमेंट या सूत्राच्या आधारे राबविलेली धोरणे, कोविड व्यवस्थापनामध्ये एकूणच प्रेरणादायी ठरलेले ‘मुंबई मॉडेल’, धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोविडवर राखलेले नियंत्रण अशा सर्वंकष कामगिरीचे नेतृत्व करुन असाधारण अंमलबजावणी केल्याबद्दल कौतुक करीत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना क्विम्प्रो फाऊंडेशनने पदक, पुरस्कार व प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित केले आहे.

कोविड संसर्ग नियंत्रणात : पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!