मालाडमध्ये मनसेच्या विभाग अध्यक्षावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला
मुंबई : मालाड येथील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांच्या जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मालवदे हे जखमी झाले आहेत.

शनिवारी दुपारच्या सुमारास माळवदे हे मनसैनिक समवेत मालाड स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत का याची पाहणी करण्यासाठी गेले होते त्याच वेळी 5 ते 6 फेरीवाल्यांनी त्यांच्यावर लोखंडी रोडने हल्ला केला. माळवदे यांच्या डोक्याला जोरदार प्रहार केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे मनसैनिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून फेरीवाला विरुद्ध मनसे असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!