कुर्ल्यात  कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान 

घाटकोपर ( निलेश मोरे ) दोन दिवसांपूर्वी बांद्रातील बेहरामपाड्यात झोपड्यांना लागलेली आग शांत होत नाही तोच आज  सकाळी 10:30 च्या सुमारास कुर्ला एल बी एस रोडवरील कल्पना टॉकीजच्या शेजारील असणाऱ्या 4 कपड्यांच्या गोदाम आणि एका टायरच्या दुकानाला आग लागली . शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत गोदामातील कपडे जळून खाक झाले तर टायरने पेट घेतल्याने आगीचे लोळ खूपच वाढले होते . घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल होऊन हि आग आटोक्यात आणणे अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले . सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र कपड्यांचे गोदाम असल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *