मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बुधवारी रूग्णालयात दाखल झाले असून शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या खोडसाळ मेसेज आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!