मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर वडील ज्ञानदेव रेडकर यांनीही आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामुळे राऊत रेडकर यांच्या राज्यपाल भेटींची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप वानखेडे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं जात आहे. इज्जत आणि अब्रूवर टीका केली जात आहे. टॉन्ट मारले जात आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती राज्यपालांकडे मांडली आहे. ही सत्याची लढाई आहे आणि विजय आपलाच होणार असल्याची प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे राऊत आणि रेडकर यांच्या राज्यपाल भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!