राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
कामे होत नसल्याची नगरसेकांनी केली हेाती ओरड
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेतली. मनसेच्या नगरसेवकांनी कामे होत नसल्याचे गा-हाणे राज यांच्याकडे मांडल्यानंतर राज यांनी विविध विषयावर आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, राजेश कदम, मनोज घरत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे हे दोन दिवसाच्या कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत. शुक्रवारी राज यांनी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधला. यावेळी मनसेच्या नगरसेवकांनी कामे होत नसल्याची नाराजी राज यांच्याकडे मांडली होती.  तसेच वॉर्डात साफ सफाईसाठीही पालिका कर्मचारी येत नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज यांनी केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेतली. बेकायदा फेरीवाल्यांच्या प्रश्न असो वा इतर समस्याविषयी मनसेने केलेल्या पाठपुराव्याच्या निवेदनासंदर्भात राज यांनी आयुक्तांकडे विचारणा केली.  महापालिका आयुक्तांच्या केबीनमध्ये राज यांची विविध प्रश्नावर आयुक्तांशी चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *