डोंबिवली, दि.29 ; चोरी लुटमारी आणि फसवणूक करणा-या पाच जणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवलं.विशेष म्हणजे ही टोळी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात भारतीय चलन दिल्यास पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवित नागरिकांना फसवित होती. यांच्याकडून ११ विविध गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

शुभम बोराडे, आकाश पोळे, आकाश शर्मा, रफिक शेख, मोहीन अहमद अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व चोरटे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचेकडून जबरी चोरीचे २ गुन्हे, घरफोडीचे २ गुन्हे, वाहन चोरीचे ६ गुन्हे व फसवणुकीचा १ असे एकुण ११ गुन्हे उघडकीस आणले आहे. .या चोरटय़ांक़डून तीन रिक्षा, तीन बाईक, मोबाईल, दागिने आणि काही रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.


मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले होते. सतत वाहनचोरी, चेन सँचिंग किंवा घरफोडी अशा घटना घडत होत्या. त्यामुळे अशा कालखंडात आरोपीनां जेरबंद करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणांसमोर उभे ठाकले होते. अखेर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!