कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वर्ग- ३ आणि वर्ग- ४ च्या कर्मचा:याना दिवाळीसाठी १५ हजार रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. गेल्यावर्षीही दिवाळीसाठी १५ हजार रुपयांचे बोनस देण्यात आला हेाता.
यंदाच्या वर्षी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे त्याच प्रमाणे या महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक ११ टक्के रोखीने देण्यात येणार आहे त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी यावर्षी वर्ग एक आणि वर्ग 2 चे अधिकारी वर्ग वगळून वर्ग-३ आणि वर्ग- ४ कर्मचारी वर्गासाठी रुपये १५००० सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या अनुदानाचा लाभ महापालिकेतील कर्मचारी, शिक्षण मंडळातील स्थायी, अस्थायी, कंत्रटी अशा ५ हजार ३४२ कर्मचा-यांना मिळणार आहे.