अवघ्या काही तासातच बुध्द मुर्तीचा शोध लागला 

कल्याण : बुध्द विहारातून चोरीला गेलेल्या बुध्द मुर्तीचा शोध लावण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या  पोलिसांना यश आलयं.  अवघ्या  २४ तासाच्या आतच पोलिसांनी चोरीला गेलेली बुध्दाची मुर्ती शोधून काढल्याने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतूक होत आहे.

कल्याण पूर्वेतील लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ असलेल्या बुध्दविहारातील पितळेची  बुध्द मुर्तीची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. बुध्दा मुर्तीच्या चोरीमुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी बुध्द मुर्तीचा त्वरीत न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी जोमाने तपास काम सुरू केल्यानंतर, अखेर दामोदरनगर लोकग्राम परिसरात रस्त्याच्या कडेला ही मुर्ती आढळून आली. बुध्द विहारात ही मुर्ती ठेवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *