मनसैनिकांनो, सोशल मिडीयाचा अधिक वापर करा

डोंबिवलीच्या मेळाव्यात कार्यकत्यांना राजमंत्र

डोंबिवली ( संतोष गायकवाड  ): सध्या सोशल मिडीयाचे युग आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा अधिक वापर करा, जनतेची कामे करा असा राजमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी डोंबिवलीत पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांना दिलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या दौ-यावर आले आहेत. त्यानिमिताने सकाळी पदाधिकारी व कार्यकत्यांचा मेळावा पार पडला. जनतेची कामे करा. लोकांपर्यंत पोहचा असे आदेश राज यांनी देत  कामे  कशाप्रकारे करावीत याच्या सुचना दिल्या. सध्या सोशल मिडीयाचे युग आहे.    प्रत्येकाने सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात करा असा राजमंत्रही कार्यकत्यांना दिला. तसेच काम न करणा- याला पदावरून हटविण्यात येणार असल्याचीही तंबी राज यांनी दिलीय.  राज यांनी मनसेच्या नगरसेवकांशी चर्चा केली, त्यावेळी नगरसेवकांनी कामे होत नसल्याचे गा-हाणे त्यांच्यासमोर मांडले. त्याच पार्श्वभूमीवर राज हे शनिवारी केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेणार आहेत.

 

One thought on “मनसैनिकांनो, सोशल मिडीयाचा अधिक वापर करा, डोंबिवलीच्या मेळाव्यात कार्यकत्यांना राजमंत्र”
  1. Raj sahebani Khup chan sandesh dila aahe .kahi log raj sahebanchh navane chukichi kame karatat pahile tyana aala ghatla pahije aapan sarvani lokana madat keli tar lok nakki aaplyala sapot kartil raj saheb ha dhadaka kayam chalu theula pahije lokanchha manjech aaplya sarvanchha khup samasha aahet purn Mumbai Madhe khup log aahet je matdan,karat nahi khup log jyachakade aadhar kard nahi,pen kard nahi aasha lokana Mumbai cha bhaher kadle pahije pan he jeva shaky hoel ki pratyek vibhagatil nagar sevak aani aapli manse Milan kale pahije..tyaveli aapla marathi menus jaga hoel aani aaplyala sahayog dael lokana aaplyavar vishaswas basle pahije ..Kay manse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *