अल्पवयीन मोलकरणीला दिले चटके; कल्याणातील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार

कल्याण  (आकाश गायकवाड)  – पश्चिमेतिल मोहन प्राईड या उच्चभ्रू सोसायटीत राहण्याऱ्या एका दांम्पत्याने घरकाम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण करीत तिच्या हातावर चटके देऊन तिचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड़किस आला आहे.अखेर या मुलीने धाडस करीत त्यांच्या तावडीतून आपली सुटका करुन तेथून पळ काढला.  हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगून त्यांच्या मदतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दिल्लीहून सदर मुलीला एका एजेंट मार्फत त्या दाम्पत्याने आपल्या घरी काम करण्यासाठी आणले होते. तीला काम करणयांवरुन ते सुरुवातीला मारहाण करीत असे .नंतर त्यांनी तिचा अमानुष छळ करीत तिच्या अंगाला चटके देण्यास सुरुवात केली.अखेर सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित मुलीने कसा बसा पळ काढला. त्या पीडित मुलीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!