डोंबिवली : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मनसे आमदार राजू पाटील यांनी मन सैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले व त्यानंतर दुर्गा पूजा करत आरती केली.

यावेळी मनसे आमदार राजू पाटील  यांनी सांगितले की कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आली, मंदिर त्यांनी उघडली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची भरपाई सरकारने दयावी. त्वरित पंचनामे करावे, पंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी अशी मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत, महिला शहर अध्यक्ष मंदा ताई पाटील , कोमल पाटील, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे उपस्थित होते.

शिवसैनिकांनी आरती आणि टाळ वाजवत केली देवाची प्रार्थना
डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. शिवसैनिकांनी गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले व त्यानंतर टाळ वाजवत भक्ती भावाने गणेश पूजन आणि दुर्गा पूजा करत आरती केली.शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, भाऊ चौधरी ,डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे,तात्या माने, राजेश कदम, भैया पाटील, सतीश मोडक ,वैशाली दरेकर ,मंगला सुळे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!