कल्याण : मुंबईत क्रुझवरील ड्रग्जपार्टी विरोधात एनसीबीने धडक कारवाई केल्यानंतर आता कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीसच गुन्हेगारांसोबत दारू पितात असा आरोप आमदार गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडालीय.
कल्याण पूर्वेत अंमली पदार्थांची विक्री केली जात असून यामध्ये तरूण वर्ग मोठया प्रमाणात अडकली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळेही नागरिक भयभित झाले आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आमदार गायकवाड यांनी पोलीसांवर टीका केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,