कल्याण : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आलीय. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हे दोन दिवस कल्याण डोंबिवलीच्या दौ-यावर होते. मात्र सरदेसाई यांची पाठ फिरताच शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकत्यांमध्ये राडा झाला आहे. युवा सेनेच्या अध्यक्षाला शिवसेनेकडूनच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे युवा सेना व शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आलाय.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील शिवसेना शाखेत शनिवारी वरूण सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांचा मुलाखती घेतल्या. कल्याण पूर्वचे युवासेना अधिकारी संजय मोरे हे वरूण सरदेसाई यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र या भेटीनंतर संजय मोरे हे आपल्या घरी पायी जात असताना शिवसेनेच्या शाखेच्यामागे मोरे यांना मारहाण करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मोरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मोरे यांनी पोलीस ठाण्यात तसेच पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केलीय. या घटनेबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी नकार दर्शविला. मात्र, युवा सचिव वरूण सरदेसाई यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल अस स्पष्ट केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!