मुंबई : एका अलिशान क्रुझवर अंमली विरोधी पथक अर्थात NCB च्या पथकाने छापा टाकून कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. एनसीबीने पहिल्यांदाच अशा प्रकारे क्रुझवर छापा टाकून कारवाई केलीय. एनसीबीने अनेकांना ताब्यात घेतले असून यामध्ये उद्योजकांसह सेलिब्रेटींचा समावेश असल्याचीही माहिती मिळतेय.
मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर फॅशन शो च्या नावाखाली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या क्रुझवर जवळपास १५०० लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. NCB ने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.