कल्याणात २८ व २९ ऑक्टोबरला बुध्दिबळ स्पर्धा
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण तालुका बुध्दिबळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ”पहिल्या महापौर चषक खुल्या बुध्दिबळ स्पर्धे ”चे आयोजन दि. २८ व २९ ऑक्टोबर, २०१७ रोजी कल्याण स्पोर्टस कॉम्प्लेक्स, आधारवाडी रोड, कल्याण (प.) येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय बुध्दिबळ स्पर्धेत सुमारे २५० खेळाडू भाग घेणार असून, आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ मास्टर समीर कठमाळे,शरद टिळक, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे-साठे हेदेखील सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सेमी क्लासिकल आणि ब्लिट्स अशा २ गटात होणार असून, सेमी क्लॉसिक या गटाला रुपये १ लाख, तर ब्लिट्स या गटाला रुपये १५ हजार ६०० रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडुंनी सहर्ष सोमण -०९३२१७२६९७२ आणि मोहित लढे -९०२९१०६५७० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले आहे.