मुंबई, दि.25 : महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. ४ ऑक्टोबरपासून शाळा ७ ऑक्टोबरपासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

विद्यामंदिराबरोबरच आता भक्ती मंदिरेही उघडणार !

यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!