कल्याण : प्रवासावर निर्बंध असतानाही रेल्वेतून गांजाची तस्करी केली जता असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसमधून बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २१ किलो अमली पदार्थ कल्याण आरपीएफ ने जप्त केला आहे. हे अमली पदार्थ ( गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून याचा तपास सुरू आहे
शुक्रवारी पहाटे 2 वाजून 30 मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास ओडीसाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेस च्या डी 2 बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती .या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या .घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आर पी एफ ने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेस ची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅग बॅग आढळून आली. त्यात अंमली पदार्थ आढळून आले असून पोलिसांनी जप्त केले आहे.