डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील गलथान कारभार सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रूग्णालयात रूग्णाला घेऊन गेल्यानंतर इमरजन्सी विभागातील नर्स वॉर्ड बॉय झोपलेले असल्याचा प्रकार उजेडात आला. मात्र रूग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर वॉर्ड बॉयकडून त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली हा सगळा प्रकार नातेवाईकांनी व्हिडीओमध्ये कैद केलाय . त्यामुळे बेजबाबदारपणे वागणा-या वॉर्डबॉयवर पालिका काय कारवाई करते याकडं लक्ष वेधलय.

डोंबिवलीत राहणारे रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे हे आपल्या वडिलांच्या छातीत दुखू लागल्याने मध्यरात्री तीनच्या सुमारास न शास्त्रीनगर  रूग्णालयात घेऊन आले, यावेळी शास्त्रीनगर रुग्णालयातील इमरजन्सी  विभागातील नर्स व वार्ड बॉय साखर झोपेत होते. त्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल अर्धा तासानंतर वॉर्ड बॉय जागा झाला तर नर्सने दरवाजा उघडला .त्यानंतर रुग्णावर उपचार करण्याऐवजी बिथरलेल्या वॉर्डबॉय ने थेट आनंद नवसागरे यांना  अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्का बुक्की केली. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून देखील हा वॉर्ड बॉय थांबत नव्हता. नवसागरे यांनी हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमे-यात कैद केला आहे.वॉडबॉय दारू प्यायलेल्या अवस्थेत होता त्याला झोपेतून उठवल्याने त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप नवसागरे यांनी केला असून बेजबाबदार वॉर्डबॉयवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


दरम्यान या घटनेबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी  सुहासिनी बेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तक्रार प्राप्त झाली असून या  प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *