डोंबिवली : काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी आपला वाढदिवस चिमुकल्यांसोबत साजरा केला. बदलापूर जांभूळ पाडा येथील आकृती फाऊंडेशनच्या येथे हा वाढदिवस साजरा झाला. यावेळी गोरगरीब महिलांना साडया वाटप आणि चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
जांभूळ येथील आकृती फाउंडेशन कडून अनाथ बालकांचा सांभाळ केला जातो. त्यांच्या राहण्यापासून ते शिक्षणाचा खर्च या फाउंडेशन कडून केला जातो गेल्या १६ वर्षापासून फाउंडेशन काम करीत आहे. यामधील अनेक मुले ही परदेशात नोकरीला लागली असून तेच विद्यार्थी फाउंडेशनला आर्थिक मदत पुरवीत आहेत. काँग्रेस चे सचिव आणि आगरी कोळी भूमिपुत्र संघटनेचे नेते संतोष केणे यांनी या चिमुकल्या मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला. मुलांकडूनही त्यांच्या पुढील भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. यावेळी माजी सरपंच हेदुटणे तकदीर दशरथ काळण, अध्यक्ष कोळेगाव विकास प्रतिष्ठान प्रेमनाथ पाटील, अॅड शशिकांत काथोड पाटील, जयेश पाटील, मधुकर माळी, निखिल म्हात्रे, शिवाजी माळी, भूषण पाटील, अखिलेश काळण, हरेश सावन पाटील, नवनाथ गायकर, शिरीष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच डोंबिवलीयेथील अर्जुन स्मृती या त्यांच्या राहत्या घरी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.