डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील राम नगर परिसरातील रघुराम सोसायटी च्या दुसऱ्या मजल्यावरील घरात आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक  आग लागली. धूर येऊ लागल्याने सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलास आगीची माहिती दिली अग्निशमन विभागाने तत्काळ घटना स्थळी धाव घेतली .अग्निशमन दलाचे दोन बंब गाड्या त्वरित घटनास्थळी धाव घेऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडून आगीवर तासाभरात पूर्णपणे नियंत्रण मिळविले .दरम्यान घरात एक 80 वर्षीय वृद्ध इसम होते रहिवाशांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं .घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते .सोसायटीतील इतर रहिवाशी यांनी ही प्रसंगावधान राखत सोसायटीतून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे मात्र दरम्यान घरात एक ८० वर्षीय वृद्ध इसम होते रहिवाशांनी त्यांना सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *