मुंबई : ४३ वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना काळात ऑन ड्युटी मृत पावले त्यांच्या विधवा पत्नी सरकारी आर्थिक भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले असल्याने कामगार विभाग व कामगार मंत्री चर्चेत आले आहेत .
कोरोना काळात ऑन ड्युटी असताना जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असताना 57 सुरक्षा रक्षक मृत पावले त्यांच्या विधवा पत्नी मंडळाच्या पायऱ्या झिजवत आहेत . विधवा पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांची अशी होणारी फरफट या सरकारला शोभते का ? असा सवाल कामगार नेते लक्ष्मणराव भोसले व हनुमंतराव सुरवसे यांनी सरकारला केला आहे.
सुरक्षा रक्षकांना मिळणारे गणवेश , बुट , टोपी , महिला रक्षकांच्या साड्या बंद करून ड्रेस देणे सुरू केले आहे त्याची गुणवत्ता , शिलाई , गणवेश मोजमाप , गणवेश देण्याचा अवधी या सर्व कारभारात मंडळाचे अध्यक्ष गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सुरक्षा रक्षक नेहमीच संतप्त होत असतात. जे सुरक्षा रक्षक अन्यायाविरोधात संतप्त होतात त्यांना मंडळाचे अध्यक्ष प्रतीक्षा यादीवर ठेवण्यासाठी निरीक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात. प्रतीक्षा यादीवर वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेक सुरक्षा रक्षक अन्याय सहन करत आहेत.
मंडळात माने व गांधी या क्लार्क कम अधिकरी समजणाऱ्या या दोन्ही महिला आम्हीच मंडळाचे मालक आहोत असे वर्तन सुरक्षा रक्षकांची करत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षक करत आहेत. सुरक्षा रक्षक यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही मंडळाचे अध्यक्ष मूग गिळून गप्प बसले आहेत. काही कामगार संघटना तर कमिशन व भरती मधील टक्केवारी यावर जगत आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक अन्याय सहन करत आहेत. मंडळाचे काही निरीक्षक खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी मालकांच्या मर्जी प्रमाणे वागत आहेत. तर काही निरीक्षक आम्ही मंडळाचे मालक आहोत अशी वर्तणूक सुरक्षा रक्षकांना बोलताना वर्तणूक करत आहेत.
सरकारने जर कोरोना काळातील मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नींना व तांच्या वारसांना जर नुकसान भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन करून मृत सुरक्षा रक्षकांना न्याय देऊ. मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी या प्रकरणी सरकारला प्रस्ताव दिला आहे मात्र सरकारकडून विलंब होत आहे तो विलंब दूर करून कोरोणा काळातील मृत सुरक्षा रक्षक कुटुंबीयांना द्यावा अशी मागणी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले व हनुमंतराव सूरवसे यांनी केली आहे.