कृषी राज्यमंत्री सदाभाऊंवर औषध फवारण्याचा प्रयत्न
यवतमाळ : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर फवारणी पंपाने औषध फवारण्याचा प्रयत्न झालाय. याप्रकरणी पोलिसांनी सिकंदर शाह या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर आणि सोयाबीन आदी पिकांवरील किड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच सरकारविरोधात रोष आहे. सदाभाऊ हे यवतमाळ दौ-यावर असताना त्यांना शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावं लागल.