सुभद्रा पवार आत्महत्येप्रकरणातील एसीपी मोकाट
तृप्ती देसाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
ठाणे : ठाणे पोलीस कार्यालयातील महिला पेालीस कर्मचारी सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कारणीभूत असणारे एसीपी शामकुमार निपुंगे यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी सुभद्रा पवार यांच्या मुळगावी अकोले तहसीलवर सामाजिक कार्यकर्त्या तुर्प्ती देसाई यांनी मोर्चा काढून आंदोलन केल.
ठाणे पोलीस कार्यालयातील महिला पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार हिने महिनाभरा पूर्वी ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती या घटनेला महिना उलटून गेला तरी अजून एकाच आरोपीला अटक करणात आली आहे मात्र आत्महत्येला कारणीभूत असणारे एसीपी शामकुमार निपुंगे याना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. सुभद्रा पवार हिला न्याय मिळावा व आरोपी असलेल्या पोलीस अधिका-यावर कारवाई करावी अशी मागणी करीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली अकोले बस स्थानकाहून मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील व पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आलं. आरोप असलेल्या पोलीस अधिकार्याला आठ दिवसात अटक न झाल्यास ठाणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्यान अश्या घटना मध्ये वाढ होत असून येत्या अधिवेशनात स्वतंत्र गृहमंत्री नेमून राज्याला अच्छे दिन आणावेत अस आवाहन देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय.