बीजिंग : चीनमध्ये ७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान चीनच्या अनेक भागांत तापमानाचा पारा जबरदस्त घसरला होता. तेव्हापासून चीनच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात थंडीची लाट पसरली असून, या भागातल्या तापमानात सुमारे २० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. शानक्सी, शांक्सी, हेनान आणि शानडोंग, हेनान, हुबेई, हुनान आणि गुइझोऊ येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. चिनी नागरिक आपल्या वसंतोत्सवाच्या सुट्ट्या घालवून परतीच्या प्रवास करत असताना त्यांना या थंडीच्या लाटेचा फटका बसला. यामुळे रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक आणि जलवाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिक प्रशासनांनी विविध उपाय करुन वाहतूक सुरळीत ठेवली होती. आता पुन्हा एकदा अतिथंडीचा व हिमवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन पुढील तयारीत गुंतले आहेत.
चीनमधले सध्या शीतलहर पसरली असून जनजीवनाला त्याचा मोठा फटका बसला आहे. चिनी हवामान केंद्राने येत्या काही दिवसांमध्ये बीजिंग आणि इतर अनेक प्रांतांमध्ये थंडीची लाट, हिमवादळे, गोठवणारा पाऊस, जोरदार वारे आणि दाट धुके पसरेल असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!