घर घ्यायचे असले तर सर्वसामान्य आणि विकासक नेहमीच कनेक्टिव्हिटीचा विचार करतो. रोड रेल्वे आणि एअर या कनेक्टिव्हिटीमुळे आता नाशिकला अधिकच महत्व आलय. मात्र कनेक्टिव्हिटीबरोबच उत्तम हवामानही मन रमायला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील अनेक बिल्डरांनी त्यांचे प्रोजेक्ट नाशिकमध्ये केले आहेत. त्यामुळे नाशिककडे सर्वसामान्यांची पावले वळू लागली आहेत.

नाशिकमध्ये मुंबई पुण्याच्या तुलनेत भरपूर बजेट होम्सपासून अफोर्डेबल अपार्टमेंटस आणि उंची घरापर्यंत सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. घर घेणा- यांसाठी या ठिकाणी मुबलक पर्याय आहेत. मुंबई पुण्यातले रहिवासी सेकंड होम किंवा एक भविष्यातील गुंतवणूक म्हणून नाशिकला घर घेत आहेत. गेल्या १५ वर्षामध्ये नाशिक शहराचा चेहरामोहरा चांगलाच बदलला आहे त्यामुळे शहरातल्या लहान मोठया विकासकांनी या ठिकाणी रो हाऊसेस व्हिलाज अपार्टमेंट असे विविध प्रोजेक्ट सुरू केले आहेत. एकूणच शहराचा कायापालट होत आहे. मुंबई नाशिक सहापदरी रोड सुरू झाल्याने सहा तासांचा होणारा प्रवास साडेतीन ते अडीच तासांवर येऊन ठेपला आहे. तसेच इथलं जीवनमान देखील बदलेलं असून सर्वसामान्य दुकानांपासून ते मोठे शॉपिंग मॉल्सपर्यंत विविध ऑप्शन तयार आहेत. नाशिक शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणत सातशे ते साडेसातशे फूट उंचीवर मुंबईतल्या दमट हवामानापेक्षा थंड आणि मोकळी हवेशीर वातावरण देणारे शहर म्हणूनच ओळखले जाते. मुंबईत समुद्र जवळ असल्याने नेहमीच दमट आणि उष्ण हवामान असते त्यामुळे मुंबईकर हैराण होऊन जातात यालट नाशिक शहरात दिवसा कितीही ऊन असले तरी रात्री मात्र चांगली थंडी आणि मोकळी हवा वाहते. विकासाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत नाशिक शहराचे नाव घेतले जाते. वर्दळीच्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते चार पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत शहरातील गंगापूर रोड मध्य नाशिक नाशिक रोड यासारख्या जास्त वर्दळीच्या ठिकाणी चार पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नाशिकमधून बाहेर पडताना मुंबई पुणे जळगाव सूरत आणि वणीला जाताना रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील विकासकांनी नाशिक शहराचा विवचार करून मोठ मोठे प्रोजेक्ट सुरू केले आहेत. शहराच्या कानाकोप-यात जाण्यासाठी सिटी बसेस ऑटो रिक्षा आणि इतर वाहतुकीची व्यवस्था आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळच असून आता नाशिक एअर कनेक्टिव्हिटीनेदेखील जोडले जात आहे. नाशिक हे शिक्षणाचे मोहर घरच ओळखले जाते. शहरातील शैक्षणिक सुविधा देखील जास्त चांगल्या आणि दर्जात्म्क असल्याने या शहरात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मॅनेजमेंट कॉलेज इंजिनिअरींग कॉलेज मेडीकल कॉलेज लॉ कॉलेज अॅग्रीकल्चर कॉलेज एव्हीएशन कॉलेज कम्युनिकेशन अॅण्ड जर्नलिझम कॉलेज तसेच आर्टस कॉर्मस आणि सायन्स कॉलेज जवळपासच्या अंतरावर आहेत.तसेच शहरात इंटरनॅशनल हायस्कूलचे प्रमाणही वाढले आहेत. नाशिक कसारा बससेवेने आणि तिथून लगेच लोकलने मुंबईला त्वरीत जाता येते. त्यामुळे जलद कनेक्टिव्हिटी आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे नाशिकच्या विकासालाही चांगलीच गती प्राप्त झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!