राज ठाकरेंची आज वसईत जाहीर सभा

ठाकूर घराणेशाहीवर ठाकरे हातोडा ?

वसई / संतोष गायकवाड : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आजपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. मात्र त्यांची पहिली जाहीर सभा आज वसई येथील नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर होणार आहे. वसई तालुक्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्यामुळे ठाकूर घराणेशाहीवर ठाकरे हातोडा पडण्याची शक्यता आहे. वसई नालासोपारा विरार पालघर भागात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे राज हे ठाकूर यांच्यावर तोफ डागण्याची शक्यता आहे. राज यांनी आजपर्यंतच्या भाषणात मोदी आणि भाजप सरकारवर निशाना साधलाय. त्यामुळे या सभेत कुणा कुणावर निशाना साधतात याकडं सर्वाचं लक्ष वेधलय.

2014 च्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले, तसेच मोदी लाटेचाही फटका सहन करावा लागला होता. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी राज ठाकरे पून्हा मैदानात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे शिवसेनेशीही त्यांचा सामना रंगण्याची शक्यता आहे.

वसईतील ५ हजार अनधिकृत बांधकाम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत वसईतील ५ हजार अनधिकृत चाळीचा प्रश्न आणि ते बांधणारे अमराठी बिल्डर आणि स्थानिकांचे पाठबळ यावर हल्ला चढविला होता. त्यामुळे आजच्या सभेत या अनधिकृत बांधकामांंच्याही प्रश्नावरून स्थानिक नेते व मुख्यमंत्री यांना लक्ष करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!