मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा – २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू न शकल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

  पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – २०२२ च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करणार

  राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!