पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे ‘ जागो मुंबईकर ‘आंदोलन
मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात मंगळवारी मुंबई काँग्रेसच्यावतीने मुंबईतील प्रमुख मुंबईतील प्रमुख ७० पेट्रोलपंपवर ‘जागो मुंबईकर जागो’ जनजागरण आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर भारतात सर्वात जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८० रुपये आणि डिझेलचा प्रति लिटर ६३ रुपये तसेच एलपीजी गॅस सिलेंडर ७८० रुपये झालेले आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत भाजप सरकारतर्फे हि दरवाढ मागे घेतली जाणार नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.