आजपासून पेट्रोल डिझेल स्वस्त पण पाईप गॅस महागणार ?
दिल्ली : एकिकडे केंद्र सरकारने पेट्रेाल डिझेलच्या दरात दोन रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे सीएनजी दीड रूपयांनी तर पाईप गॅस ३० रूपयांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देत धक्का देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
पेट्रेालचे दर ८० रूपये प्रतिलिटर आहे. 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रुपयांची वाढ झाली. पेट्रेाल आणि डिझलेच्या दरात वाढत्या दरांमुळे विरोधकांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकल असून वाढत्या दराविरोधात जनतेत रोष व्यक्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीचा विचार करून केंद्र सरकारने पेट्रेाल व डिझेलवरील अबकारी करात दोन रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून ही कपात लागू होणार आहे.