मुंबईः बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांतील (एनबीएफसी) आघाडीची कंपनी असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेड (एलटीएफएच) ने डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाची ग्राहकांभिमुख रिटेल एनबीएफसी कंपनी बनण्याच्या दिशेने दमदार प्रवास आणखी वेगाने सुरु केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी 75 टक्के कर्ज हे रिटेल पोर्टफोलिओ स्वरुपातील असून लक्ष्य 2026 मध्ये निर्धारित केलेल्या उद्दीष्टाच्या 80 टक्क्यांपैकी अधिक उद्दीष्ट कंपनीने गाठलेले आहे.

वित्तीय वर्ष 2023 मध्ये कंपनीने 42 हजार 65 कोटी रुपयांचे रिटेल कर्ज वितरित केले आहे. गतवर्षाशी तुलना करता त्यात 69 टक्के वाढ कंपनीने साध्य केली आहे. एकूण रिटेल कर्जाचे प्रमाण सध्या 61 हजार 53 कोटी रुपये असून 31 मार्च 2022 च्या तुलनेत त्यात 35 टक्के वाढ झाली आहे. संपुर्ण वर्षात घाऊक (होलसेल) कर्जात 54 टक्के कपात करत त्याचे प्रमाण 19 हजार 840 कोटी रुपयांवर आणले आहे.

कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) 2022-23 या वित्तीय वर्षासाठी एक हजार 623 कोटी रुपये नोंदविला गेला असून त्यात वार्षिक 52 टक्के वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या निव्वळ चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा गत चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढून 501 कोटी रुपयांवर गेला आहे.

कंपनीच्या चमकदार आर्थिक कामगिरीबद्दल बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दिनानाथ दुभाषी म्हणाले की, मालमत्तेच्या उत्तम गुणवत्तेसह रिटेल बुक मध्ये झालेली ३५% वाढ तसेच होलसेल बुक मधील निर्णायक ५४% झाल्यामुळे हे यश साध्य झाले.
वर्षभरात व्यूहात्मक धोरणांच्या अंमलबजावणीमुळे योजनेतील लक्ष्य वेगाने गाठण्यात कंपनीला मोठी मदत झाली आहे. ग्राहकाभिमुख आणि सातत्यपुर्ण फिनटेक अॅट स्केल या धोरणांसाठी आम्ही आमची ही गती भविष्यातही काय ठेवू. ग्राहकांच्या अर्थव्यवस्थेभोवती फिरणारे रिटेल कर्ज प्रकार कंपनी सतत सादर करत राहील आणि त्याआधारे एकमेकांना पूरक वितरण (क्रॉससेल) आणि अधिकाधिक विक्री करणाऱ्या योग्य अशा सक्षम वितरण शाखा तसेच अत्तुत्तम वितरण धोरणाची निर्मिती केली जाईल, असे श्री. दुभाषी यांनी स्पष्ट केले.

एलटीएफएचने 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात रिटेलच्या सर्व प्रकारात अतिशय बळकट अशी वाढ साध्य केली आहे.

कंपनीने वर्षभरात ग्रामीण भागात 16 हजार 910 कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे. विविध भौगोलिक प्रदेशात खोलवर आणि सक्षम अशी वितरण यंत्रणा उभी करणे तसेच व्यूहात्मक पुढाकारावर लक्ष केंद्रीत करत योग्य अशा कर्ज प्रकारांचे विस्तारीकरण याआधारे ग्रामीण भागात कंपनीने ही वाढ साध्य केली आहे.

देशात ट्रॅक्टरसाठी वित्तसहाय्य क्षेत्रातील बाजारपेठेत कंपनी अव्वलस्थानी आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात शेतकऱ्यांना सहा हजार 450 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे. त्यात वार्षिक 25 टक्के वाढ झाली आहे. तसेच निव्वळ चौथ्या तिमाहीत कंपनीने उच्चांकी वित्तसहाय्य साध्य केले आहे. शहरी भागासाठी वित्तपुरवठ्यात वार्षिक 72 टक्के वाढ होऊन 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात ते 16 हजार 727 कोटी रुपयांवर गेले आहे. वित्तीय वर्ष 2023 मध्ये गृह कर्ज, मालमत्तेच्याआधारे कर्जाच्या मासिक वितरणाने महत्वाचा 500 कोटींचा टप्पा ओलांडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!