पोरबंदर एक्स्प्रेसच्या शौचालयातून दारुचा साठा जप्त

(आकाश गायकवाड)
कल्याण : दक्षिणेकडून गोव्यामार्गे गुजरातला जाणाऱ्या कोचिवेल्ली-पोरबंदर एक्सप्रेसमधून रेल्वे पोलिसांनी सोमवार मोठा मद्यसाठा जप्त केलाय. जनरल डब्याच्या शौचालयाच्या वरच्या भागात हा मद्यसाठा लपवून ठेवण्यात आला होता अशी माहिती कल्याण रेल्वे  सुरक्षा बलाचे प्रमुख संदीप आम्बेसे याांनी दिली.

गोवा येथील मडगाव  रेल्वे स्थानकात पोरबंदर एक्सप्रेस च्या डब्ब्यात मोठा मद्यसाठा चढवण्यात आल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल ते कोपर स्थानकांदरम्यान कल्याण आरपीएफने या गाडीत शोधाशोध केली असता जनरल डब्यात शौचालयाच्या छताच्या आत वोडकाच्या तब्बल दोन हजार बाटल्या लपवण्यात आल्याचं आढळलं.या मद्यसाठ्यासोबत कुणीही सापडलं नाही. हा मद्यसाठा दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती  रेल्वे पोलिसांनी दिली.  यातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून यात मोठा रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *