मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक योग्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अटक केली पाहिजे, असं खळबळजनक विधान विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे.
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, असं थेट विधान प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केलं. कॅबिनेटचा विषय हा कोर्टाचा आणि चौकशीचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे जो न्याय केजरीवालांना लावला तोच न्याय मोदींना लावायला हवा, याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधलं. दरम्यान, महाविकास आघाडीसोबत आहात का, नक्की आघाडीत काय घडलं, मनोज जरांगे-पाटील यांच्याशी काय चर्चा झाली या सर्व बाबींवर येत्या २ एप्रिलला उत्तरे देणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी महाविकास आघाडीचे दरवाजे अजून बंद केलेले नाहीत, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
राऊत आघाडीत बिघाडी करताहेत ..
प्रकाश आंबेडकरांनी आज पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकेचा जहरी बाण सोडला. ‘संजय आघाडीत बिघाड करतोय, महाविकास आघाडीची चुकीची माहिती देतोय’, असे गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केले. त्याचवेळी मी उद्धव ठाकरेंवर नाराज नाही, असंही स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या चर्चेत सुभाष देसाई असेपर्यंत सर्व ठीक होतं… पण नंतर कोणाला तरी कुणासाठी वापरायचं असा हिशेब सुरू झाला, या शब्दांत आंबेडकरांनी राऊतांना लक्ष्य केलं. त्याचवेळी आम्हाला फक्त तीन जागांचा प्रस्ताव होता, त्यात अकोला लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.