मुंबईत गुटख्याची तस्करी : ४३ लाखाचा गुटखा हस्तगत
मुंबई : येथील डोंगरी आणि सांताक्रुझ या परिसरातून सुमारे ४३ लाखाचा गुटखा आर्थिक गुन्हे विभागाच्या पेालिसांनी जप्त केला आहे. दोन दिवसात ही कारवाई पोलिसांनी केली आहे. त्यामुळे मुंबईत मोठया प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.
डोंगरी परिसरातील सोलापूर स्ट्रीट विभागातील एका गोदामात गुटखा उतरवण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागाला मिळाली होती त्यानुसारच पोलिसांनी सापळा धाड टाकून त्या गोदामातून १५ लाख किंमतीच्या गुटख्याचे ६० बॉक्स हस्तगत केले. राजकोटहून मुंबईत आणल्याचे उघडकीस झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा अन्न व प्रशासन विभागाकडे देण्यात आला आहे. . दरम्यान मंगळवारीही सांताक्रुझ येथून २८ लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून ते एका पोलिस अधिका-याचा नातेवाईक असल्याच सांगितले जात आहे.