डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दित कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण होण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे अशी मागणी डोबिवली शहर बी ब्लॉक काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे त्यामुळे देशात व राज्यात लसीकरणावर जोर दिला जात आहे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र अपुरे असल्याने नागरिकांना लसीकरणासाठी खूप तारांबळ उडत आहे त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७७ मधील बी आर मढवी इंग्लिश स्कुल तसेच डोंबिवली पश्चिम येथे लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत अशी मागणी प्रणव केणे यांनी आयुक्तांकडे केली आहे
————–