डोंबिवली स्टेशन परिसरात जागेवर बसण्यावरून फेरीवाल्यांमध्ये हाणामारी : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

डोंबिवलीत (शंकर जाधव) :  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात महानगरपालिका कार्यालयासमोरच फेरीवाल्यांमध्ये जागेवर बसण्यावरून हाणामारीचा प्रकार घडलाय. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.  फेरीवाल्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तीन दिवसांपूर्वी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. या घटनेमुळे पालिका अधिकार्यांकडून  फेरीवाल्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली स्टेशनपरिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विभागा कडून नेहमीच बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. ‘ फ’प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत हे फेरीवाला हटाव धोरण राबविण्यास अपयशी ठरले आहेत. फेरीवाल्याचे पालिका अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबध गुंतले असल्याने फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली जात नाही. तीन दिवसांपूर्वी आयुक्तांनी या परिसराचा पाहणी दौरा केला होता.  त्यादिवशी हा परिसर फेरीवाला मुक्त ठेऊन आयुक्तांसमोर देखावा उभा केला. मात्र आयुक्तांची पाठ फिरल्यानंतर परिस्थिती जैसे थे बनली. फेरीवाल्यांनी पथपदावर जागा ताब्यात घेतली असून या जागेवर अन्य कोणी फेरीवाला बसल्यास हाणामारीचे प्रकार घडतात. सोमवारी दुपारच प्रकार त्यातूनच घडलाय. पालिकेच्या कार्यल्यासमोरच फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे पालिका अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!