ठाणे : दिपावली हा सण मोठ्या जल्लोषात रोषणाईत फटाक्यांची आतिषबाजी करुन तसेच नवनविन वस्तूंची खरेदी करुन साजरा करण्यात येतो. पारंपारीक दिपोत्सव प्रत्यके घरात आपल्या आर्थिक क्षमतेनुसार साजरा होत असतो. दिवाळी सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीने कष्टकरी व गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करताना तसेच गरजू लोकाचे चेह-यावरील आनंद पाहता खुप मानसिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन बृहमुंबई महानगरपालिकचे प्रकल्प अधिकारी सुभाष सांबरे यांनी व्यक्त केले.
५ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील न्याहाडी पाडा या आदिवासी वाडीतील २९ कुटुंबियांना दिवाळी फराळ,आकाश कंदिल व महिलांना नविन साडया,व कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले होते.यावेळी बृहमुंबई महानगरपालिकचे प्रकल्प अधिकारी सुभाष सांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रमुख अथिती निलेश कुडतरकर तसेच यावेळी आदिवासी वाडीतील स्थानिक रहिवासी यशवंत हिलम,बंटी हिलम, सरपंच चंद्रकात पारधी, मंगेश मुकणे तसेच संस्थेचे पदाधिकारी अँड जनार्दन सुदाम टावरे,अँड.अतूल शेळके,संतोष खेताडे, शंकर पाटील, सचिन सावंत, आप्पा भोसले, प्रविण मालूसरे, मंगेश टेंबे, गणेश मंजूळे, गुरुनाथ भोईर, सुहास मोहळ, अमोल जाधव, श्रीराम चौधरी प्रमोद थूळ, किरण शिरसाठ, मनोज गिरी, आदी पदाधिकाऱ्यांसह आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन केदार शेरे यांनी केले.