मुंबई : गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवून हुकुमशहा होण्याची पाऊले टाकलीत.  नवीन संविधान निर्माण करण्यासाठीच  लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ४०० पार चा नारा दिला जात आहे देशाचे संविधान धोक्यात आले आहे त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन  फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनस फॉर सोशल जस्टिस,  सेक्युलॅरिझम एंड डेमॉक्रॅसी  या संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे. 

फेडरेशनने मतदारांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, भाजप हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे बाहाण्याने मनुस्मृती आधारित हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न करीत आहे.  कर्नाटक,राजस्थान, उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांकडून जाहीरपणे सांगितले की नवीन संविधान निर्माण करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक खासदार आम्हाला हवेत. त्यांना वर्तमान संविधान जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ,न्याय,धर्मनिरपेक्षता,लोकशाही, समाजवाद, प्रस्थापित करणारे संविधान हटवायचे आहे.भाजप पक्ष धर्म आणि जाती द्वेष निर्माण करणारा पक्ष आहे. शिक्षण,कामगार,शेतकरी ,महिला इत्यादी बाबत हे सरकार संवेदनशील नाही, उलट घातक आहे, या दहा वर्षात हे सिद्ध झाले आहे. मोदी सरकारने संघटित भ्रष्टाचार करून निवडणूक रोखे खरेदीचे माध्यमाने हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा बरबाद केला आहे.  लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडून विरोधी पक्ष  नष्ट करण्याची पावले भाजपने टाकली असून ती देशविघातक आहेत.  मणिपूर दंगल सरकारद्वारा प्रायोजित असून त्यासमयी प्रधानमंत्री मूक – बधिर झाले आहे.  स्त्री ,दलित ,आदिवासी, मुस्लीम,शीख,ख्रिश्चन धर्माचे लोकांवर अन्याय- अत्याचार गेल्या दहा वर्षात वाढले आहेत. १०. प्रचंड बेरोजगारी व महागाईने देश बिकट परिस्थितितुन जात आहे. देशाचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या सर्व कारणांमुळे  जनतेने भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील सर्व मतदार- संघातील इंडिया प्रणित उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी मतदान करावे असे आवाहन नागपुरातील ८० संघटनांचे फेडरेशन असलेल्या सामाजिक  संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी आणि इतर उमेदवार  ज्या पक्षांनी उभे केले आहेत, त्यामुळे मत विभाजन होऊन भाजपला निवडून आणण्यासाठी मार्ग मोकळा होतो, असे समाजाला वाटत असून ते विभाजन टाळून भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असेही आवाहनात म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!