भिवंडी /प्रतिनिधी : भिवंडीतील पटेल कंपाऊंड जीलानी ही तीन मजली इमारत कोसळण्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टीडीआरफ टीम आणि एनडीआरएफ (NDRF) टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या इमारतीला सुमारे ३०-३५ वर्ष झाले असून धोकादायक झाल्याची माहिती समोर आली आहे. रहिवाशी झोपेत असतानाच पहाटे हा प्रकार घडला आहे.
