नवी दिल्ली: होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) सारख्या भारतातील अग्रगण्य प्रिमियम कार उत्पादन कंपनीने, बजाज फ़िन्सर्व लिमिटेड; सारख्या देशातील आघाडीच्या आणि वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा विभाग असलेल्या बजाज फ़ायनान्स लिमिटेड सह एकत्र येत आपल्या ग्राहकांना परवडतील अशा आणि आकर्षक उपाययोजना द्यायचे ठरविले आहे. या भागीदारीमुळे होंडाचा ग्राहकांना होंडा अमेझ, होंडा सिटी आणि लवकरच बाजारात येणाऱ्या एक्सयुव्ही होंडा एलिवेटसाठी आकर्षक कार फ़ायनान्स स्कीम्स सह कमी व्याज दर आणि तंटामुक्त जलद अशी कर्जाची मंजूरी मिळण्यास मदत होणार आहे.
या भागीदारी अंतर्गत, बजाज फ़ायनान्स लिमिटेडद्वारे होंडाच्या ग्राहकांना सानुकूलित अशा किरकोळ आर्थिक स्कीम्स उपलब्ध करून दिल्या जातील त्यासह – फ़्लेक्झी पे स्कीम, डिजिटल-फ़र्स्ट एक्सपिरियन्स आणि ऑन रोड 100% टॉप-अप फ़ंडिंग (उदा: कमी व्याज दर (RoI) जो 8.75% पासून सुरू होत असेल; तंटामुक्त मंजूरी आणि टर्न ओवर टाईम हा फ़क्त 30 मिनिटांचा असेल) सारख्या सुविधा देखील दिल्या जातील. या ही पलिकडे सोयीचे ठरावे म्हणून, कर्जाची रक्कम जमा होण्यापर्यंतची संपूर्ण आर्थिक प्रक्रिया ही एका डिजिटलमाध्यमाने पूर्ण केली जाईल.
यावेळी बोलताना, होंडा कार्स इंडियाचे विपणन आणि विक्री विभागाचे, उपाध्यक्ष, कुणाल बेहल म्हणाले, “ होंडा कार्स इंडिया येथे आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अशा सुविधा देण्यास कटीबद्ध आहोत आणि म्हणूनच बजाज फ़ायनान्ससह आमच्या भागीदारी बद्दल अधिक उत्सुक देखील. या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना बऱ्याच आर्थिक उपाययोजनांचा लाभ घेत गाडी आपल्या मालकीची करून घेण्याचा अनुभव मिळू शकेल. बजाज फ़ायनान्सद्वारे दिल्या जाणाऱ्या या विविध स्कीम्स आणि पर्यायांमुळे ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या आणि वैयक्तिक स्तरावर उपयोगी पडू शकतील अशा वैविध्यपूर्ण उपाय योजना दिल्या जातील.”
बजाज ऑटो फ़ायनान्सचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी असलेले सिद्धार्थ भट म्हणाले, “ आमच्या डिजिटल-फ़र्स्ट दृष्टीकोनामुळे आणि परवडणाऱ्या उपाय योजनांमुळे (फ़्लेक्झी लोन्स) ग्राहकांना गाडी घेणे आता अधिक सहज आणि अगदी सोपे झाले आहे. आमच्या अगदी थेट अशा प्रक्रियेचा मानस हा सहजता वाढविणे आणि कर्ज देण्याची गती वाढविण्याचा आहे. आम्हाला होंडा कार्स इंडिया सह एकत्र येताना अतीशय आनंद होतो आहे कारण आम्ही तंटा-मुक्त आणि अधिक लवचिक अशा आर्थिक उपाय योजना घेऊन ग्राहकांसमोर येऊ ज्यामुळे त्यांना होंडाचे वाहन अगदी सहज पद्धतीने आपल्या घरी आणता येऊ शकेल.”
होंडा कार्स इंडिया आणि बजाज फ़ायनान्स यांना खात्री आहे की या भागीदारीमुळे बाजारातील त्यांची स्थिती अधिक बळकट होईल आणि या एकत्रित ध्येयामुळे ग्राहकांना उत्तम अशा आर्थिक उपाय योजना उपलब्ध करून दिल्या जातील.
बजाज फ़ायनान्स ही तांत्रिकतेवर आधारीत एनबीएफ़सी आहे, यांच्याद्वारे व्यापक अशा आर्थिक उपाय योजना ग्राहकांना प्रदान केल्या जातात ज्यामुळे ग्राहकांना एक उत्तम डिजिटल अनुभव देखील मिळतो.
एचसीआयएल द्वारे असे बरेच उपक्रम हाती घेतले गेले आहेत ज्यामुळे ग्राहकांकरिता गाडी घेणे अधिक आकर्षक आणि अभिमानास्पद बाब ठरू शकेल. एचसीआयएल ने इतर आर्थिक कंपन्यांसह देखील भागीदारी केली आहे जसे पीएसयु बॅंक, रिटेल फ़ायनान्सरिज आणि एनबीएफ़सी ज्यामुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव चांगला ठरतो, आणि त्यांना त्यांच्या विविध गरजा भागविण्याकरिता बरेच आर्थिक पर्याय देखील उपलब्ध होतात.