महाडमध्ये शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायती भाजपने हिसकावल्या
सेनेचे वर्चस्व कायम, काँग्रेसकडे श्रीमंत ग्रामपंचायती

महाड ( निलेश पवार ) – महाडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. शिवसेनेने तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले असले तरी सेनेच्या ताब्यातील दोन ग्रामपंचायती भाजपने हिसकावून घेत ग्रामपंचायती निवडणुकीत प्रथमच खात उघडलं आहे. श्रीमंत आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेसन विजय मिळवला आहे.  काँग्रेसच्या ताब्यात असलेली दासगाव या ग्रामपंचायतीवर जवळपास ३५ वर्षांनी बदल होऊन सेनचा झेंडा फडकवला गेलाय.

महाड तालुक्यात एकूण ७३ ग्रामपंचायतींमध्ये मतदानप्रक्रिया पार पडली. यातील २६ ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाल्या. तर सहा ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिले आहे. यामुळे ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सोमवारी घेण्यात आल्या होत्या. मंगळवारी हे निकाल जाहीर करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने प्रथमच खाते उघडले. तालुक्याध्यक्ष जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवत खाते उघडले आहे. जयवंत दळवी यांच्या चिंभावे ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. सरपंच व सदस्यही भाजपचे विजयी झाले आहेत. तर रानवडी आणि ताम्हाणे या दोन्ही ग्रामपंचायती कायम शिवसेनेनकडे राहिल्या आहेत. मात्र यावेळी रानवडी आणि ताम्हाणे ग्रामपंचायती भाजपने शिवसेनेकडून हिसकावून घेतल्या आहेत.
दासगाव या ग्रामपंचायतीवर जवळपास ३५ वर्षांनी बदल होऊन या ठिकाणी दिलीप उकिर्डे यांनी सेनचा झेंडा फडकवला. दासगाव हे कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांचे गाव आहे. तसेच कोल ग्रामपंचायत माजी पंचायत समिती सभापती विजय धाडवे यांच्या गावात देखील सेनेला सत्ता टिकवता आली नाही. याठिकाणी कॉंग्रेसने बाजी मारली. महाड शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सचिन ओझर्डे याचे अपक्ष सदस्य आणि सरपंच निवडून आले आहेत. किंजळघर ग्रामपंचायतीमध्ये शरद आंबावले हे कॉंग्रेस उमेदवार फक्त एक मताने विजयी झाले. याठिकाणी फेर मतदान घेण्यात आले. मात्र निकाल तोच लागला.

महाड मधील वारंगी ग्रामपंचायत मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे हे मात्र एकटेच निवडून आले आहेत. महाडमध्ये लाडवली ग्रामपंचायत निवडणूक येथील कॉंग्रेस उमेदवार कृष्णा शिंदे यांच्यामुळे प्रतिष्ठेची बनली होती. कृष्णा शिंदे हे कॉंग्रेसचे महाड तालुकाध्यक्ष असल्याने कॉंग्रेस ने याठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केले होते. येथील सेनेच्या आणि भा.ज.प. च्या युवा उमेदवारांना ग्रामस्थांनी नाकारल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कुर्ला ग्रामपंचायत आघाडीने घेतली तर नडगाव तर्फे तुडील याठिकाणी सेना आणि कॉंग्रेस ने युती केली होती. सेना अपक्ष दोन, अपक्ष ३ ,तर भा.ज.प. ने महाड मधील चिंभावे, आणि रानवडी याठिकाणी खाते खोलले आहे. चिंभावे येथे प्राजक्ता जयवंत दळवी या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निकाल प्रक्रिया पार पडली.

या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात
महाडमध्ये कॉंग्रेस ने लाडवली, केंबूर्ली, कावळे तर्फे विन्हेरे, करंजखोल, आदिस्ते, गांधारपाले, आंबवडे, किंजळघर, नाते, गोठे, देशमुख कांबळे, साकडी, दादली, कोल, धामणे, सवाणे, आचलोळी, वाघोली, जुई बु, या १७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसने बाजी मारली.

या ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व
करंजाडी, नागाव, वहूर, वारंगी, कुसगाव, नातोंडी, सावरट, वरंध, उंदेरी, खुटील, कोळोसे, दासगाव, कोथेरी, नडगाव तर्फे तुडील, बीजघर, गोंडाळे, आडी, शिरवली, वीर, नांदगाव बु, या २१ ग्रामपंचायती सेनेकडे गेल्या आहेत

भाजपने खात उघडलं
चिंभावे, रानवडी आणि ताम्हाणे या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळविला.

इथे बिनविरोध निवड
वडवली – बबन चव्हाण, बारसगाव – संगिता झांजे, पारमाची- कुंदा पवार, चिंभावे मोहल्ला- रिक्त, मोहोप्रे – जान्हवी शेडगे, राजिवली – विलास जगदाळे, शिरसवणे- वैभवी दळवी, पंदेरी- लक्ष्मी शिंदे, पाचाड – संयोगिता गायकवाड, कोंझर – लतीका पवार, वाळण बु, -गोविंद उतेकर, मोहोत- अरुणा पवार, पिंपळवाडी – मनिषा जाधव, वराठी- मनोज पातेरे, दापोली- हनुमान कदम, रुपवली- काशिनाथ घा़डगे, निगडे- कृष्णा जोरकर, तळीये – जितेंद्र पांडे, लोअर तुडील- पल्लवी चिविलकर, फाळकेवाडी- उद्य चव्हाण, रावतळी-सुधीर गिजे, चांभारखिंड- धोंडू पालकर, वाळसुरे- भागुराम मोरे, पुनाडे तर्फे नाते- कार्तिकी चव्हाण घावरेकोंड – सुनिता सुतार, कुंबळे- राहत शेखनाग

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!