कल्याण / प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी ‘प्लाझ्मा’ महत्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर येत असले तरी संबंधित रुग्णांना वेळेवर ‘प्लाझ्मा’ उपलब्ध होणेही तितकेच महत्वाचे आहे. कोणताही वेळ न दडवता रुग्णाला आवश्यक त्याक्षणी प्लाझ्मा उपलब्ध व्हावा याच विचारातून कल्याणमध्ये काही जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. या पुढाकरातूनच ‘कोवीड प्लाझ्मा डोनेशन ड्राईव्ह’चे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले असून कोवीडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी यामध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये काही आठवड्यांपूर्वी कमी झालेले कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. त्यातच आता कोवीड रुग्णांना बरे करण्यासाठी ‘प्लाझ्मा’ थेरपी महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोवीड रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा’ देणाऱ्या व्यक्तींची कोणतीही नोंदणी नाहीये. त्यामुळे इथल्या रुग्णांना आवश्यक त्या वेळेमध्ये प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्याची प्रमूख अडचण होती. नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी कोवीडमधून बऱ्या झालेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यक्तींच्या नोंदणीचा विचार जागरूक नागरिक ॲड. जयदीप हजारे यांनी मांडला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क केला. आताच्या घडीला अत्यावश्यक असणाऱ्या या कोवीड प्लाझ्मा ड्राईव्हबाबत डॉ.पाटील यांनीही विनाविलंब कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. ज्यावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमाला हिरवा कंदील दिला.त्यानूसार ‘कोवीड प्लाझ्मा ड्राइव्ह’ला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये नोंदणीसाठी गुगलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन लिंक :https://forms.gle/t3pBb6kTrZCj87b8A बनवण्यात आली आहे. यामध्ये नोंदणी करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील इच्छुक प्लाझ्मा डोनर्सना कल्याणातील अर्पण आणि संकल्प ब्लडबँक तर डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लडबँकेमध्ये प्लाझ्मा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता कोवीडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी अधिकाधिक संख्येने या प्लाझ्मा ड्राईव्हमध्ये नाव नोंदवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, डॉ. प्रशांत पाटील आणि ॲड. जयदीप हजारे यांनी केले आहे. या प्लाझ्मा ड्राईव्हसाठी डॉ. इशा पानसरे, डॉ. दिपक पोगाडे, सीए मयूर जैन, इट्स ऑल अबाऊट कल्याणचे चैतन्य देशमुख आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर ‘लोकल न्यूज नेटवर्क’ अर्थातच ‘एलएनएन’ही या उपक्रमात सहभागी झाले आहे.
गुगल लिंक :* https://forms.gle/t3pBb6kTrZCj87b8A
* ‘कोवीड प्लाझ्मा ड्राईव्ह’बाबत अधिक माहितीसाठी संपर्क * *कल्याण डोंबिवली महापालिका वॉर रूम – 0251-2211373*
*डॉ. इशा पानसरे – 8976001949* *ॲड.जयदीप हजारे – 9323042121* *मयूर जैन (CA) – 9820135050* *डॉ. दिपक पोगाडे – 9422682020*
*****