मध्यमवर्गीयांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीच स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झालीय. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते उड्डाणपूल भुयारी मार्ग खाडी किनारा विकास सिटी पार्क माध्यमातून पर्यटन स्थळ रिंगरूट रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प प्रशासनाने हाती घेतले आहेत तसेच मेट्रो, रिंगरूट, आयटी पार्क असे अनेक प्रकल्प भविष्यात साकारणात आहेत. त्यामुळे मोठं मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे आलिशान गृह संकुले उभी राहत आहेत तसेच मुंबई ठाण्याच्या तुलनेत सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं ही उपलब्ध होत आहेत. वन बीएचके २५ लाखात तर टू बीएचके ५० लाखात उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्याचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.
कल्याण हे ऐतिहासिक तर डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईतील लालबाग, परळ परिसरातील मराठी माणूस कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात विसावला आहे. कल्याण हे जंक्शन स्टेशन असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याणहून जातात. डोंबिवलीत 90 टक्के चाकरमनी राहत असल्याने लोकलच्या वेळापत्रकावरच त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात होते. रेल्वे सेवा तसेच रोड कनेक्टिव्हिटी असल्याने कल्याण आणि डोंबिवली शहर यांना जोडले आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच इथला बांधकाम व्यवसाय तेजीतच आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती असल्याने पुनर्विकास मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुंबईच्या वेशीवर असणारं कल्याण डोंबिवली शहर हे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. सध्या कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १६ ते १८ लाखापर्यंत पोहचली आहे. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत पालिकेने १४४१ कोटीचे २५ प्रकल्प प्रस्तावीत केले आहेत. दरवर्षी दोनशे कोटीप्रमाणे येत्या पाच वर्षात एक हजार कोटीचा निधी शासनाकडून स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत मिळणार आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना अधिक प्रमाणात पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. कल्याण शीळ फाटा रस्त्यावरील पलावा चौक येथे भुयारी मार्ग बांधणे, नेहरू तारांगणाच्या धर्तीवर उद्यावत तारांगण उभारण्यासाठी ५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेचे जंक्शन आहे. एक हजारांहून अधिक लांब पल्ल्याच्या लोकल गाडया या रेल्वे स्थानकातून दररोज धावतात या रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ६५० कोटीचा विकास आराखडा रेल्वेने तयार केला आहे मुंबईतील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ठाकुर्लीत रेल्वे टर्मिनर्स बांधण्यात येणार आहे त्यामुळे कल्याण परिसरातील उत्तर दक्षिते जाणा- या प्रवाशांना मुंबई दादर कुर्ला येथे जाण्याची गरज भासणार नाही. कल्याण डोंबिवली शहरात मोठया प्रमाणात विकास होत असल्याने मोठ मोठया नामांकित विकासकांनी कल्याण डोंबिवलीत मोठया प्रमाणात गृहसंकुलाची कामे सुरू आहेत. कल्याण शीळ रस्त्यावरील लोढा रिजन्सी आणि पलावा अशी मोठी माेठी गृहसंकुले सर्वांचीच लक्ष वेधून घेत आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात २५ लाखापासून वन बीएचके तर टू बीएचके ५० लाखापासून सुरूवात होते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात घर मिळत असल्याने रेल्वे रस्ते आणि इतर विकासाच्या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवलीला अनेकांची पसंती मिळत आहे. ठाण्यात सदनिकेचा दर १२ हजार रूपये चौरस फूट आहे मात्र कल्याणात ४ ते ७ हजार रूपये आहे. पालिकेने विकासकांना ओपन लॅण्ड टॅक्समध्ये सवलत दिल्याने विकासकांना होणारा नफा ग्राहकांना देण्याचा मानस एमसीएचआयचे अध्यक्ष रवी पाटील यांनी व्यक्त केलाय.
स्मार्ट सिटी : कल्याण डोंबिवली शहराचे नाव स्मार्टसिटी यादीमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे या शहरांना स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्यामदतीने पाावले उचलण्यास सुरूवात केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून १ हजार ४०० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. . कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी नागपूर शहराप्रमाणे याठिकाणीही प्रकल्प राबवणे आवश्यक आहे.पुण्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे कल्याण डोंबिवलीत उभारन्यात येणार आहे.नदी आणि खाडीकिनारा सुशोभीकरण करण्यासाठी 60 कोटी निधी दिला असून, जलवाहतुकी सुरू होण्यासाठी कल्याण डोंबिवलीत 2 जेट्टी उभारण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत कल्याण भिवंडी ठाणे मेट्रो प्रकल्प, रिंगरूट प्रकल्प, सिटी पार्क, कल्याण स्टेशन परिसर विकास आदी प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.
स्टेशन परिसराचा विकास : स्टेशन परिसरातील विकासाला प्राधान्य देेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ४५० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. स्टेशन परिसर, एसटी बस डेपोचा विकास आणि एपीएमसी येथील मेट्राेचे स्टेशन एकमेकांशी जोडले जाणार आहे.
सिटी पार्क : कल्याण डोंबिवली महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी अतंर्गत कल्याण पश्चिमेत गौरीपाडा येथे सिटी पार्क साकारण्यात येणार असून नुकतेच शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सुमारे ११० कोटीचा हा प्रकल्प आहे. सिटी पार्कसाठी १ लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागा आरक्षीत आहे त्यापैकी ९३ हजार २३२ चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. ३६ हजार ६१५ चौ जागा सीआरझेड मध्ये आहे. सिटी पार्कमध्ये १७०० झाडे लावली जाणार आहे. त्यात ६७९ झाडे हिरवी ९५१ झाडे मोसमी व ७० पाम ट्री आहेत. लॅण्डस्केपिंग स्पोर्ट कॉम्पलेक्स लहान मुलांना खेळण्यासाठी जागा प्रदर्शन हॉल ७५० क्षमतेचा रंगमंच बांबू थीम रेस्टॉरंट बॉटनिकल गार्डन सीसीटिव्ही कॅमेरे जनरेटर टेक्सटाईल फॅब्रिक अम्ब्रेला आदी आहे.
कल्याण मेट्रो : ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो टप्पा क्र ५ च्या मार्गिकेचे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्यामुळे कल्याणात मेट्रो धावणार आहे. कल्याण मेट्रो ५ ची लांबी २४. ९ किमी असून या मार्गावर १७ स्थानके आहेत. या प्रकल्पात किमान सव्वा तीन हेक्टर खासगी जमीन संपादीत करावी लागणार आहे. कार डेपोसाठी १५ हेक्टर बांधकामासाठी ६ हेक्टर जमीन लागणार आहे तर खासगी ३ २५ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८ हजार ४१६ कोटी रूपये आहे. कल्याण एपीएमसी मार्केट- कल्याण मेट्रो -स्टेशन सहजानंद चौक- दुर्गाडी किल्ला -आधारवाडी- गाेवेगाव एमआयडीसी- राजनाेली -टेमघर- गोपाळनगर- भिवंडी- धामणकर नाका- अंजूरफाटा पूर्णा- कोलशेत आणि कशेळी बाळकूम नाका आणि कापुरबावडी आदी १७ स्टेशन आहेत. कल्याण मधील मेट्रोचा शेवटचा थांबा पत्रीपुलाजवळ आहे. कल्याणमधील मेट्राे मार्ग दुर्गाडी लालचौकी सहजानंद चौक ते रेल्वे स्थानक आहे हा मार्ग खडकपाडयापर्यंत विस्तारीत करण्यात येणार आहे कल्याण मेट्रोचा मार्ग डोंबिवली ते तळोजापर्यंत विस्तारीत करण्यास मंजुरी मिळाली आहे.,
टाऊन प्लॅनिंग : कल्याण पश्चिमेतील उल्हास खाडी किनारी उंबर्डे वाडेघर गावातील २५० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे नवीन शहर वसविण्याचा आराखडा पालिकेन तयार केला आहे. त्यासाठी कोरीअन कंपनीने पुढाकार घेतला आहे. आयटी पार्क सिटी पार्क मनोरंजन नगरी उद्याने बगीचे आदी नवीन सुविधा साकारल्या जाणार आहेत. तसेच २७ गावातही दावडी सोनारपाडा उंबार्ली आणि हेदुटणे या गावांच्या हद्दीतील ४०० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सुविधांचे शहर वसिवण्याचा आराखडाही पालिकेने तयार केला आहे. कल्याण आणि डोंबिवली हा खाडी किनारी परिसर आहे त्यामुळे त्या भागाचे सोँदर्यीकरण करण्यात येणार आहे.
कोणाची कामे सुरू …
कल्याणात रिजन्सी ग्रुप , आधारवाडी उंबर्ड येथे साई सत्यम ग्रुुप, रेानक सिटी, डोंबिवलीत हॅप्पी होम, स्वामी नारायण ग्रुप, वास्तू संकल्प, गंधारी, ऋतुपार्क, डावखर इन्फ्रास्ट्रक्चर, शंकेश्वर ग्रुप, श्रीजी इन्फ्रा स्ट्रक्चर, मेहता ग्रुप यांचे मोठी मोठी गृहसंकुलांची कामे सुरू आहेत.