बौद्ध धम्मच जगातील सर्वश्रेष्ठ धम्म – रामदास आठवले
नागपूर – महाकारुणी तथागत बुद्धांनी दिलेला धम्मच मानवकल्याणासाठी जगातील सर्वश्रेष्ठ धम्म ठरला आहे . बौद्ध धम्म हा आदर्श जीवन मार्ग असून याच मार्गाने दलित आदिवासी बहुजनांसह सर्वांचा उद्धार होणार आहे . त्यामुळेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय भारताचे स्वप्न पाहिले होते .असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कामठी येथे केले . नागपूर पासून जवळ असलेल्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये आयोजित जागतिक बौद्ध धम्म शांती परिषदेचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या .
सम्राट अशोकानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्म चक्र परावर्तित करून विश्वातील सर्वात मोठी धम्मक्रांती केली . याचा आम्हाला अभिमान आहे .भारत बौद्धमय करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करा असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले . या बौद्ध धम्म शांती परिषदेत जगभरातून बौद्ध धम्म प्रतिनिधी उपस्थित होते .जपान ; थायलँड ; हॉंगकाँग; तिबेट ; म्यानमार आदी अनेक राष्ट्रांतून बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *