अलिबाग – भाऊराय हॅण्डलुम सोलापुर यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धि व विक्री कार्यक्रमा अंतर्गत हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल रायगड जिल्हा परिषद जवळ मुख्य पोस्ट ऑफिस समोर अलिबाग या ठिकाणी केले आहे. सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक ह्यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उदघाटनपार पडले. हे प्रदर्शन २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत खुले राहणार आहे तरी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन भाऊराया हॅण्डलुम चे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले आहे.
उद्घाटन प्रसंगी पांडुरंग पोतन , गोवर्धन कोडम , बाळू कोडम, पुरुषोत्तम पोतन , दीपक गुंडू, श्रीकांत श्रीराम, लक्ष्मण उडता आदी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन म्हणाले की यांत्रिक युगामध्ये स्पर्धा करीत सर्व समस्यांशी सामना करून त्यांचे पिढीजात पारंपारिक हातमागावर समृद्धीचे वस्त्र विणण्याचे आणि वस्त्र संस्कृतीच्या अमूल्य ठेवा जोपासण्याचे काम आपले विणकर अविरतपणे काम करीत आहे. त्यांच्या या गतिशिल प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे. व त्यांनी तयार केलेल्या हातमाग कापडाला योग्य बाजारपेठ मिळावी त्या करिता हातमाग वस्त्रोद्योग मध्ये काम करणाऱ्या संस्थांचे योगदान मिळून बळकटीकरण व सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या कलेवरच कामगाराच्या उदरनिर्वाह अवलंबून आहे. या प्रदर्शनास अलिबागकरांनी भेट देऊन विणकर कामगारांची कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून प्रतिसाद द्यावा असे आवाहन पोतन यांनी केले आहे.
सुती व खादी कापडाच्या विक्रीवर २०% टक्के सुट
हातमाग व यंत्रमागवर उत्पादित वस्त्रे जसे कॉटन साडी , इरकल साडी , मधुराई साडी , खादी साडी , धारवाड साडी , मधूराई सिल्क साडी , सेमी पैठणी, खादी सिल्क साडी , प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल , पटोला ड्रेस , कॉटन परकर , टॉप पिस , सोलापूर चादर , बेडशीट , नॅपकिन , सतरंजी , पंचा , टॉवेल , वुलनचादर , दिवाणसेट , प्रिंटेड बेडशीट , पिलो कव्हर , लुंगी , व शर्ट , कुर्ता , बंडी , गाहून , विविध प्रकारच्या विक्री साठी टेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर २०% टक्के सुट ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन २८ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.